August 27, 2025 6:30 PM August 27, 2025 6:30 PM

views 16

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं नवी दिल्लीत निधन

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९९२ च्या तुकडीतले गौर यांनी गंगटोक इथल्या आकाशवाणी केंद्रातल्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेला प्रारंभ केला होता.   सध्या ते नवी दिल्लीत वृत्त सेवा विभागात कार्यरत होते. पत्रसूचना कार्यालय आणि क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयातही त्यांनी काम केलं होतं.

March 15, 2025 2:31 PM March 15, 2025 2:31 PM

views 9

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत लौकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती.   भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषय़क स्थायी समितीने ही सूचना दिली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.