July 9, 2025 9:10 PM July 9, 2025 9:10 PM
15
गुजरातमधे अपघातातल्या मृतांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथं आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणंद आणि बडोदा जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता. अपघात झाल्यानंतर बडोदा जिल्हा प्रशासनानं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं असून, स्थानिक नागरिकही त्यांना मदत करत आहेत. आणंद इथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाहनांची वाहतूक सुरू असताना हा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात ...