October 24, 2024 1:31 PM October 24, 2024 1:31 PM
8
रशियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्र्यांचं मायदेशी आगमन
रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर काल रात्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत प्रधानमंत्री मोदी यांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी आभार मानले.