July 8, 2025 1:21 PM

views 17

‘ब्रिक्स’ समुह सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच – अर्थमंत्री निर्मला सितारामन

ब्रिक्स समूह हा सर्वसमावेशक बहुपक्षीय धोरणांना पुढे घेऊन जाणारा एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय मंच असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल रियो दि जिनेरो इथं ब्रिक्स अर्थमंत्र्यांच्या  आणि केंद्रीय बँकांच्या गर्व्हरनरांच्या बैठकीला संबोधित करत होत्या. आंतरराष्ट्रीय संस्था वैधतेच्या आणि प्रतिनिधीत्वाच्या संकटात सापडलेले असताना आपापसातलं सहकार्य वृद्धींगत करुन विश्वासपूर्वक सुधारणांचं समर्थन करणं महत्त्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या. ग्लोबल साऊथ क्षेत्रातल्या समस्या पुढे आणून...

July 6, 2025 1:10 PM

views 17

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठक संपन्न

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल रिओ दी जानेरो इथं ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांशी बैठका घेऊन धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी विविध क्षेत्रातला सहयोग वाढवण्यासह द्विपक्षीय सहकार्याच्या इतर मुद्द्यावर चर्चा केली. ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सीतारमण यांनी रशियाचे अर्थमंत्री अँटॉन सिलुआनोव्ह यांच्याशी आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याबद्दल, तसंच न्यू डेव्हलपमेंट बँक या विषयावर संवाद साधला. चीनचे अर्थमंत्री लान फोआन य...

July 6, 2025 12:48 PM

views 18

अर्जेंटिनाच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये पोहोचले, १७व्या ब्रीक्स परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा संपवून आज ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथं पोहोचले. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी अर्जेंटिलाना भेट द्यायची ५७ वर्षांतली ही पहिली वेळ आहे. या भेटीची सुरुवात मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता आणि स्वातंत्र्यसैनिक जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला आदरांजली वाहून केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांच्याशी बैठक घेतली आणि व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, आरोग्य आणि औषधनिर्मिती यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द...

April 17, 2025 1:51 PM

views 25

केंद्रीय कृषी मंत्री आज ब्राझीलमध्ये १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत होणार सहभागी

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आज ब्राझीलमध्ये साओ पाउलो इथे १५व्या ब्रिक्स कृषी मंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य, नवोन्मेष आणि व्यापारामार्फत शाश्वत कृषी तंत्राला प्रोत्साहन देण्याविषयी चर्चा होईल, असं कृषी मंत्रालयाने एका पत्रकात म्हटलं आहे. या दौऱ्यात कृषिमंत्री चौहान, ब्राझीलचे कृषीमंत्री कार्लोस फावेरो तसेच कृषिविकास आणि कुटुंबशेती मंत्री लुईझ टिकसेरा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ब्राझीलमधल्या कृषी संलग्न व्यापारात सहभा...

June 28, 2024 8:31 PM

views 14

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १०व्या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित

जागतिक पर्यावरणासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शाश्वत जीवनशैली महत्वाची असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १० व्या बैठकीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या सुरुवातीला केनियामध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेत शाश्वत जीवनशैलीचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी केली जावी, असा आग्रह यादव यांनी या बैठकीत केला.   भारताने पर्यावरणासमोरची आव्हानं पेलण्यासाठी ठोस पावलं उ...