November 16, 2025 6:32 PM

views 30

जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीत धडक

ग्रेटर नॉयडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांनी उपांत्य फेरीत धडक मारली. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीनाक्षी हिनं, तर ५८ किलो वजनी गटात प्रीती यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. पुरुषांच्या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात अंकुश आणि ९० किलो वजनावरच्या गटात नरेंद्र यांनी उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं.

April 4, 2025 1:45 PM

views 17

मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश अंतिम फेरीत दाखल

ब्राझीलमधे फोज दो इगुआचू इथे झालेल्या मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हितेश या खेळाडूने अंतिम फेरी गाठली आहे. पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात त्याने फ्रान्सच्या माकन त्राओरचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.   या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान, ५० किलो वजनी गटात भारताच्या जादूमणी सिंग याने, ६० किलो वजनी गटात सचिन सिवाच याने तर ९० किलो वजनी गटात विशाल या तिघांनी कांस्यपदक जिंकलं आहे.