November 13, 2025 7:03 PM November 13, 2025 7:03 PM

views 27

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाची  ८ चित्त्यांची देणगी

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने  ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या  प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल. यापूर्वी नामिबियामधून ८ तर दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले आहेत. त्यातले बहुतेक सगळे इथल्या वातावरणाला सरावले आहेत.     राष्ट्रपती द्...

November 8, 2025 1:27 PM November 8, 2025 1:27 PM

views 27

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आहेत.   त्यानंतर 11 नोव्हेंबरला त्या बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वानाच्या अध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच तिथल्या संसदेला संबोधित करतील.