December 30, 2024 8:18 PM December 30, 2024 8:18 PM

views 4

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट : चौथ्या सामन्यात भारताचा १८४ धावांनी पराभव

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा १८४ धावांनी पराभव केला. ५ सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २ - १नं आघाडीवर आहे.  दुसऱ्या डावात विजयासाठी ३४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ १५५ धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ३४० धावांचं...