January 5, 2025 7:32 PM January 5, 2025 7:32 PM

views 19

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली

बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं १६२ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.   आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं.   ऑस्ट्रेलियानं बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका तब्बल दहा वर्षांनी ज...

January 5, 2025 9:31 AM January 5, 2025 9:31 AM

views 15

बॉर्डर-गावसकर चषक : क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 6 बळी घेतले. भारताने कालच्या 6 बाद 129 धावांवरून आपला डाव सुरू केल्यानंतर भारताने केवळ 28 धावांची भर घातली. 

December 26, 2024 2:09 PM December 26, 2024 2:09 PM

views 15

बॉर्डर गावसकर क्रिकेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथा सामना सुरू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथे सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येक एकेक सामना जिंकला आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३११ धावा झाल्या होत्या.

December 17, 2024 2:42 PM December 17, 2024 2:42 PM

views 8

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला फॉलोऑन टाळण्यात यश

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच्या ४ बाद ५१ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र  कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. केएल राहुल आणि आणि रवींद्र जडेजा यांच्या लढाऊ अर्धशतकी खेळींनी भारताचा डाव सावरला, त्यानंतर अखे...

December 6, 2024 8:15 PM December 6, 2024 8:15 PM

views 12

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात

ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड मैदानावर बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर तर विराट कोहली केवळ सात धावा करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कनं ६ गडी टिपून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. नितीश रेड्डीच्या ४२, के. एल राहुलच्या ३७ तर  शु...

November 22, 2024 8:03 PM November 22, 2024 8:03 PM

views 12

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर समाप्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डावही अवघ्या १५० धावांत गडगडला. मात्र भारतीय संघ अद्यापही ८३ धावांनी आघाडीवर आहे. भारतीय संघाच्या डावाला आकार देण्यात नवोदित नितीश कुमार रेड्डीनं मोलाची भूमिका बजावली. ४१ धावांचं योगदान देणाऱ्या नितीश क...

November 21, 2024 3:50 PM November 21, 2024 3:50 PM

views 17

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून सुरुवात

क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळू शकत नसल्यामुळे जसप्रीत बुमराह हा नेतृत्व करणार आहे. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण मोर्ने मार्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वगुणाची वार्ताहर परिषदेत प्रशंसा केली. उद्याचा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटां...