December 27, 2024 3:15 PM December 27, 2024 3:15 PM

views 4

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या पाच बाद १६४ धावा

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद ४७४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली. विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे ३६ आणि २४ धावांवर बाद झाले. रोहित शर्मा अवघ्या तीन धावा करू शकला तर आकाशदीप शून्यावर बाद झाला. सलामीला उतरलेल्या यशस्वी जयस्वालने ८२ धावा केल्या. या धावांच्या बळावर आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पाच बाद १६४ धावा झाल...

December 17, 2024 8:56 PM December 17, 2024 8:56 PM

views 2

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेटमधे तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे.   आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच्या ४ बाद ५१ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र  कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. केएल राहुल आणि आणि रवींद्र जडेजा यांच्या लढाऊ अर्धशतकी खेळींनी भारताचा डाव सावरला, त्यान...

December 16, 2024 8:07 PM December 16, 2024 8:07 PM

views 6

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि के एल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला.