November 25, 2024 7:09 PM November 25, 2024 7:09 PM
16
भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी
बॉर्डर- गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १- शून्यने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला २९५ धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी विजयांपैकी एक ठरला. भारताचा कर्णधार जसप्रित बुमरा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ २३८ धावांमधे गुंडाळला गेला. तत्पूर्वी विराट कोहलीची नाब...