November 11, 2025 1:37 PM November 11, 2025 1:37 PM

views 97

ब्रिटिश लेखक डेविड सॅले यांच्या ‘फ्लेश’ या कादंबरीला यंदाचा ‘बुकर पुरस्कार’

हंगेरी वंशाचे ब्रिटिश लेखक डेविड सॅले यांच्या फ्लेश या कादंबरीला २०२५ चा प्रतिष्ठित असा बुकर पुरस्कार जाहीर झाला. लंडनमध्ये काल झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा झाली. रोख ५० हजार पाऊंड असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.    सॅले यांच्या फ्लेश या कादंबरीतून हंगेरीतील हाऊसिंग इस्टेटपासून लंडनमधील श्रीमंत वर्गाच्या आलिशान हवेल्यांपर्यंत अनेक दशकांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. कादंबरीच्या कथानकात भावनिकदृष्ट्या तुटलेल्या आणि उदासीन अशा व्यक्तीच्या जीवनप्रवासाचं चित्रण करण्यात आलं आहे. ...

May 21, 2025 1:44 PM May 21, 2025 1:44 PM

views 30

कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ लघुकथासंग्रहाला ‘बुकर पुरस्कार’

कन्नड लेखिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक यांनी लिहिलेल्या आणि दीपा भस्थी यांनी इंग्लिशमध्ये भाषांतरित केलेल्या ‘हार्ट लॅम्प’ या लघुकथासंग्रहाला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर नाव कोरणारा हा पहिलाच लघुकथासंग्रह आणि पहिलीच मूळ कन्नड साहित्यकृती आहे. तसंच दीपा भस्थी या बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय भाषांतरकार आहेत. दक्षिण भारतातल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा सामना करणाऱ्या महिला आणि मुलींची व्यथा मांडणाऱ्या १२ कथा या संग्रहात आहेत.