December 22, 2025 8:45 PM

views 18

लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांची सीबीआय चौकशीची मागणी जनहित याचिका फेटाळली

पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी २०२३ सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत एफआयआर दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्यामुळे ही याचिका फेटाळल्याचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाने  म्हटलं आहे.  याचिकाकर्त्याने वारंवार याच आरोपांची या...

December 18, 2025 3:33 PM

views 32

तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथे राहणाऱ्या एका नागरिकाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं ३० ते ४० वर्षं जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात. त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस ब...

December 2, 2025 8:30 PM

views 85

Maharashtra: २८५ नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला-Nagpur Bench BHC

महाराष्ट्रातल्या सर्व २४३ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या २१ डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. सुरवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं, मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २० डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला. यामध्ये २४ नगराध्यक्ष आणि २०४ सदस्यांच्या जागांचा समावेश आहे.  \ सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा २० डिसेंबरला निवडणूक होणाऱ्...

October 18, 2025 2:25 PM

views 27

अभिनेता अक्षय कुमारला हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता अक्षय कुमार याला तात्काळ प्रभावाने हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान केलं आहे. याद्वारे न्यायालयाने समाज माध्यम मंच, ई-कॉमर्स संकेतस्थळं आणि ए आय निर्मित चित्रफीत निर्मात्यांना त्याचं नाव, प्रतिमा, साम्यस्थळं आणि आवाज वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत. डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपली प्रतिमा अवैधरित्या मलिन करण्याविरोधात अक्षय कुमार यानं वाणिज्यिक आय पी याचिका दाखल केली होती. याची दखल घेत ए आय चा वापर करून बनवलेल्या आभासी प्रतिमा आणि व्हिडिओ यांचं वास्तववादी स्वरूप अत...

October 15, 2025 7:24 PM

views 60

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना सक्तवसुली संचालनालयानं केलेली अटक ही बेकायदा असल्याचा निर्वाळा देऊन त्यांची तत्काळ सुटका करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. पवार यांना अटक करताना ईडीकडे ठोस पुरावे नव्हते आणि अशी अटक पीएमएलए कायद्याला धरून नाही, असा निर्वाळा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं दिला.

September 18, 2025 7:17 PM

views 31

Bombay High Court: हैदराबाद गॅझेट विषयक निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली

मराठा समाजाच्या नागरिकांना इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या हैदराबाद गॅझेट विषयक शासन निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. याच मुद्द्यावरची रीट याचिका आधीच न्यायालयासमोर प्रलंबित असल्याचं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं नमूद केलं आणि एकाच विषयावरच्या अनेक याचिका दाखल करून घेता येणार नाहीत, असं सांगत याचिका फेटाळून लावली.

August 5, 2025 1:21 PM

views 30

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. असे खटले हाताळणाऱ्या रजिस्ट्री आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांनी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसंच या संदर्भात उचललेल्या पावलांबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीला सादर करावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.   सदर समितीने १७ जून, २४ जून आणि ७ जुलै रोजी झालेल्या बैठकींमध्ये या मुद्द्यावर चर्चा करून निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संबंधित अस...

July 23, 2025 3:38 PM

views 21

पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींंचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. तसंच, विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. पीओपी मूर्तींवरच्या बंदीसंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाने काही शिफारसी आणि सूचना देणा...

July 10, 2025 8:03 PM

views 14

बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज मुदतवाढ दिली. तसंच याबाबतची सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली.    मुंबई आणि आसपासच्या परिसरात  वायू प्रदूषणाची पातळी गंभीर होत आहे, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना सहा महिन्यांमध्ये मुंबईतल्या सर्व बेकर्‍यांमध्ये गॅस अथवा इतर ह...

June 10, 2025 7:26 PM

views 21

मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणासाठीची तयारी प्रगतीपथावर

मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं (live-streaming ) थेट प्रक्षेपण सुरु करण्यासाठी तयारी प्रगतीपथावर असल्याची माहिती आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी दिली. अशा प्रकारची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी सांगितलं की  ५ न्यायपीठांचं कामकाज प्रथम प्रसारणासाठी उपलब्ध होईल.    त्यात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या पीठाचा पहिला क्रमांक आहे. रेवती मोहिते- डेरे आणि नीला केदार, एम एस सोनक आणि जि...