September 7, 2024 1:18 PM September 7, 2024 1:18 PM
17
मणिपूरमध्ये आज झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये आज सकाळपासून झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जरिबाम जिल्ह्यात एका व्यक्तीला, तो घराबाहेर झोपला असता गोळी घालण्यात आली. नंगचेपी भागात दोन गटात झालेल्या हिंसाचारात तीन दहशतवाद्यांसह चार जणांचा मृत्यू झाला. तांगजेंग खुजाओ भागात दोन जण जखमी झाले. मोयरांग शहरात झालेल्या एका गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले. काल रात्री विविध ठिकाणी तैनात असलेल्या मणिपूर रायफल्सच्या तुकड्यांना जमावांनी घेराव घालून त्यांच्य...