August 14, 2024 1:32 PM August 14, 2024 1:32 PM

views 10

‘गौरव’ या लांब पल्ल्याच्या क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी

लांब पल्ल्याची क्षमता असलेल्या, गौरव या स्वदेशी बनावटीच्या बॉम्बची काल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं अर्थात डीआरडीओ नं यशस्वी चाचणी घेतली. ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई विमानातून या बॉम्बची चाचणी घेतल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. डीआरडीओ च्या हैदराबादमधल्या संशोधन केंद्रात विकसित केलेल्या गौरव या बॉम्बनं एका बेटावर निर्माण केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ सह हवाई दल आणि उद्योग क्षेत्राचं कौतुक केलं.