November 17, 2024 2:30 PM November 17, 2024 2:30 PM

views 9

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी

भारतीय रिझर्व बँकेवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी मिळाल्यानं काल पोलिसांनी सतर्क होत गुन्हा नोंदवला आहे. लष्कर ए तैयबाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा दावा करत एका अज्ञाताने वांद्रे इथल्या रिझर्व बँकेच्या ग्राहक सेवा कक्षात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केला होता. पोलिसांनी संबंधित परिसराची कसून तपासणी केली असता, ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं. गेले काही दिवस मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह, शहरातल्या महत्त्वाच्या इमारतींमधे बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या वारंवार मिळत आहेत. पोलीस याचा तपास करत आहेत.

September 7, 2024 12:48 PM September 7, 2024 12:48 PM

views 22

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्यात १० पॅलेस्टिनी नागरिक ठार

मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात जवळपास दहा पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती पॅलेस्टाईनमधल्या सूत्रांनी दिली आहे. मध्य खान यूनिस शहरातल्या कंदील कुटुंबाच्या घरावर इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर काही जण जखमी झाले. तसंच मध्य गाझातल्या नुसेरत निर्वासित छावणीतल्या शेहदा कुटुंबाच्या घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण मृत्यूमुखी पडले. घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता गाझाच्या आरोग्य विभागानं वर्तवली आहे. याआधी मागच्या शुक्रवारी इस्...

June 30, 2024 8:02 PM June 30, 2024 8:02 PM

views 2

नायजेरिया : बोर्नो राज्यात झालेल्या बाँम्ब हल्ल्यात १८ ठार, चाळीसहून अधिकजण जखमी

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यात काल झालेल्या आत्मघातकी बाँम्ब हल्ल्यात १८ ठार आणि चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.  हल्लेखोरांत एका संशयित महिला हल्लेखोराचा समावेश असून तीने  विवाह समारंभ, रूग्णालये आदी अनेक  ठिकाणांना लक्ष्य केलं असल्याची माहिती, बोर्नो राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे संचालक बरकिंडो सैदू यांनी दिली.