March 25, 2025 6:29 PM March 25, 2025 6:29 PM

views 9

लोकसभेत ‘बॉयलर विधेयक २०२४’ सादर

लोकसभेत आज बॉयलर विधेयक २०२४ मंजूरीसाठी सादर करण्यात आलं. बॉयलरचे नियमन, स्टीम बॉयलरच्या स्फोटापासून जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्याची तरतूद या विधेयकात आहे. देशात बॉयलरच्या उत्पादन आणि वापरादरम्यान नोंदणी आणि तपासणीमध्ये एकरूपता आणण्याची तरतूद देखील करते.   व्यवसाय सुलभतेसाठी, हे विधेयक बॉयलर वापरकर्त्यांसह एमएसएमई क्षेत्रातल्या लोकांना लाभदायक ठरेल. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. राज्यसभेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉयलर विधेय...

December 4, 2024 7:07 PM December 4, 2024 7:07 PM

views 11

राज्यसभेत बॉयलर दुरुस्ती विधेयक २०२४ मंजूर

बॉयलर संदर्भातल्या शंभर वर्षं जुना कायदा रद्द करून, बॉयलर दुरुस्ती विधेयक, २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापन करू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतूद केली आहे. तसंच, बॉयलरच्या दुरुस्तीच्या कामासाठी सुयोग्य आणि सक्षम तंत्रज्ञ नेमला जाणं अनिवार्य असेल. देशातल्या ४० लाखांहून अधिक बॉयलर्सना याचा लाभ मिळणार आह...