October 18, 2024 12:39 PM October 18, 2024 12:39 PM

views 7

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदार आढळले असून,त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करतांना, हे बोगस मतदार निदर्शनास आले.दरम्यान,या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा २० ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन होणार असून, यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून, मतदार नोंदणी संदर्भात काही आक्षेप असल्यास नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे.