February 4, 2025 8:01 PM February 4, 2025 8:01 PM
14
मुंबई महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षासाठीचं शिलकी अंदाजपत्रक सादर
मुंबई महानगरपालिकेचं २०२५-२६ या वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचं आणि ६० कोटी ६५ लाख रुपये शिलकीचं अंदाजपत्रक आज सादर झालं. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त, तसंच राज्य नियुक्त प्रशासक भूषण गगराणी, यांच्यापुढे ते सादर केलं. यंदाचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ हजार ४७२ कोटी ६६ लाख रुपयांनी वाढला आहे, तर शिल्लक रकमेत २ कोटी ४३ लाख रुपये वाढ झाली आहे. कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वर्सोवा - दहिसर लिंक रोड ते मीरा भाईंदर पर्यंतचा उन्...