January 11, 2026 7:53 PM January 11, 2026 7:53 PM

views 13

मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा वचननामा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महापालिका निवडणूकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न मिटवून मिठी नदी स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल असं मुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी सांगितलं…. होल्ड- बाईट- मुख्यमंत्री (२४ सेकंद)  बेस्ट बस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्यासह आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणार...