January 16, 2026 7:37 PM

views 42

BMC Elections : भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ७० जागांवर तर शिवसेना २१ जागांवर विजयी झाली आहे.  दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ४८ जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ ५  जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसने १९ जागा जिंकल्या.    ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ३४, भाजपा १७, राष्ट्रवादी काँग्रेस ४ ठिकाणी विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि ...

January 16, 2026 3:12 PM

views 79

BMC Elections : भाजपा आघाडीवर, ठाकरे बंधू पिछाडीवर

आतापर्यंत आलेल्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना युतीला निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. शिवसेना भाजपा युती ११९ जागांवर आघाडीवर आहे, यात भाजपा ८८ तर शिवसेना ३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ६४ जागांवर तर राज ठाकरे यांचा पक्ष केवळ सहा जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेना युती सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.    ठाणे महानगरपालिकेत शिवसेना २४, भाजपा ५, राष्ट्रवादी काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँ...

January 9, 2026 8:53 PM

views 55

मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांचं ६ वर्षांसाठी निलंबन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आदेश न मानणाऱ्या मुंबईच्या २६ भाजप कार्यकर्त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे. वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

January 2, 2026 7:41 PM

views 120

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी, मनपा शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयं, सुरक्षित पार्किंग, स्वयंरोजगार, कर प्रणाली, मोफत पाणी-वीज, १० रुपयांत जेवण, तरुणांसाठी सहाय्यता निधी, बेस्ट भाडे आदी सर्व समा...

December 30, 2025 7:16 PM

views 85

मुंबई पालिका निवडणुकीसाठी AAP चा जाहिरनामा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘केजरीवालची गॅरंटी’ याअंतर्गत मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज, उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७५ उमेदवार दिले आहेत.

December 28, 2025 7:36 PM

views 120

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे.   संविधानाला अभिप्रेत भारत घडवणं हाच दोन्ही पक्षांचा राजकीय अजेंडा असल्यानं दोन्ही पक्षांतली मैत्री नैसर्गिक स्वरूपाची असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. राज्यातील अन्य २८ महापालिकांसा...

December 20, 2025 3:04 PM

views 65

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. मुंबई हे मोठं शहर असून देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक इथं राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्मा-धर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं, असं मत त्यांनी मांडलं...

October 30, 2025 3:39 PM

views 398

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाच्या सोडतची तारीख जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगात सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगानं आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रमाचं सविस्तर वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप जाहीर झाल्यावर नागरिकांना आपल्या हरकती- सूचना नोंदविण्याची संधी मिळेल. २० नोव्हेंबरपर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सर्व हरकतींचा विचार करून पालिका आयुक्त अंतिम निर्णय घेतील आणि आयोगाची मान्यता घेऊन अंतिम आरक्षण २८ नोव्हेंबर...