December 3, 2025 7:27 PM December 3, 2025 7:27 PM

views 25

दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता महानगरपालिका सज्ज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.    चैत्यभूमी, शिवाजी पार्क, 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृहं, सुरक्षा, आरोग्य आदी बाबींची चोख व्यवस्था केली आहे. या सोयीसुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे ८ हजारांहून जास्त अधिकारी-कर्मचारी तैनात असून, चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर, तसंच महानगरपालिकेच्या विविध सम...

December 1, 2025 7:42 PM December 1, 2025 7:42 PM

views 12

गेल्या ४८ तासांत वायू गुणवत्ता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा – बृहन्मुंबई महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वायू गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक उपाययोजाना केल्या जात असून गेल्या ४८ तासांत वायू गुणवत्ता निर्देशांकात लक्षणीय सुधारणा झाल्याचं महानगरपालिकेनं म्हटलं आहे.  मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. बेकरी तसंच स्मशानभूमीचं स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणं आणि विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा यात समावेश...

November 20, 2025 6:49 PM November 20, 2025 6:49 PM

views 30

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचं  उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांनी वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतील अशी कृत्यं टाळावीत आणि...

October 6, 2025 3:39 PM October 6, 2025 3:39 PM

views 139

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी  अंतिम  प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. ही  प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

June 17, 2025 7:47 PM June 17, 2025 7:47 PM

views 39

मुंबई पालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांची कामं पूर्ण

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते सिमेंट-काँक्रिटीकरण प्रकल्पाअंतर्गत १,३८५ रस्त्यांचं मिळून सुमारे ३४३ किलोमीटर लांबीची कामं पूर्ण झाली आहेत. ही पहिल्या दोन टप्प्यातली कामं ३१ मे पर्यंत झाली असल्याचं महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. या कामात गुणवत्ता नियंत्रणासाठी आयआयटी मुंबई बरोबर महानगरपालिकेचा करार झाला होता. 

April 13, 2025 8:06 PM April 13, 2025 8:06 PM

views 17

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्या जाणार आहेत. व्यापक जनहितासाठी हा निर्णय घेतल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता खासगी गृहनिर्माण संस्था आणि इतरांना टँकरद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा करणं शक्य होईल असं पालिकेनं म्हटलं आहे....

April 1, 2025 7:31 PM April 1, 2025 7:31 PM

views 29

मुंबई पालिकेची मालमत्ता कर संकलनात विक्रमी कामगिरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर संकलनाच्या बाबतीत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी निर्धारित करण्यात आलेल्या ६ हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ६ हजार १९८ कोटी ५ लाख रुपये इतकं मालमत्ता कर संकलन केले आहे.  हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९ पूर्णांक ९७ शतांश टक्के आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.  

March 28, 2025 9:12 PM March 28, 2025 9:12 PM

views 22

सावधान ! उघड्यावर कचरा जाळल्यास बसणार दंड

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं  १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे. 

March 13, 2025 2:58 PM March 13, 2025 2:58 PM

views 18

होळीचा सण जबाबदारीनं साजरा करण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन

मुंबईकरांनी होलिका दहन आणि धूलिवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत. होलिका दहनासाठी वृक्षतोड करू नये, तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड, प्लास्टिक, रबर, टायर अश्या वस्तू होळीत टाकू नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.   रंगांचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्‍यावी, पाण्याचा अपव्‍यय टाळावा, पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले  नैसर्गिक रंग वापरावेत, अशी सूचनाही पालिकेनं दिली आहे.

February 7, 2025 7:33 PM February 7, 2025 7:33 PM

views 25

मुंबईत GBS या आजाराचा पहिला रुग्ण आढळला – मुंबई महानगरपालिका

मुंबईत GBS, म्हणजेच गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एका ६४ वर्षीय महिलेला मज्जासंस्थेच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग झाल्याचं यात म्हटलं आहे.