September 17, 2024 2:44 PM September 17, 2024 2:44 PM

views 7

उत्तरप्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका फटाक्यांच्या गोदामात स्फोट

उत्तरप्रदेशातल्या फिरोजाबाद जिल्ह्यात एका फटाक्यांच्या गोदामात काल रात्री झालेल्या स्फोटात एका लहान मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे इमारत कोसळली तसंच याचा आवाज आजूबाजूच्या दोन किलोमीटर परिसरात ऐकू आला.  

August 24, 2024 6:35 PM August 24, 2024 6:35 PM

views 11

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 22 कामगार जखमी

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या तीन गंभीर जखमी कामगारांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवलं आहे. या अपघातात एकूण 22 कामगार जखमी झाले असून इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.