July 21, 2024 7:35 PM July 21, 2024 7:35 PM
10
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल – गृहमंत्री अमित शहा
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते. केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला, युती सरकारच्या काळात बरीच विकासकामं झाली, अनेक मोठे प्रकल्प राज्यात राबवले गेले, असं शहा म्हणाले. फक्त भाजपाच महान भारत घडवू शकतो, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राममंदिर उभं राहिलं, त्यांनी देशातला दहशतवाद कमी केला, अस...