December 31, 2025 3:01 PM December 31, 2025 3:01 PM

views 14

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेना युतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेना युतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे, यानुसार भाजपा १३७ जागा लढणार असून शिवसेना ९० जागा लढवणार आहे. तर रिपब्लिकन पक्षाने स्वतंत्र ३९ जागांची घोषणा केली आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप एकत्र निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनीही काल दिवसभर एबी फॉर्मचं वाटप केलं. मात्र त्यांचं जागावाटप स्पष्ट झालं नाही. दरम्यान, राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.