January 5, 2025 7:00 PM January 5, 2025 7:00 PM

views 6

उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. गोयल स्वतः बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते. अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारावं, असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.    आजपासून भाजपानं राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान सुरु केलं  आहे. एका दिवसात किमान २५ लाख नवीन सदस्य नोंदणी करण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे.

January 4, 2025 6:32 PM January 4, 2025 6:32 PM

views 7

भाजपा उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार

भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवणार असल्याचं आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यानिमित्त एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती त्यांनी दिली. या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरमधून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.    दरम्यान, वसई परिसरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ...