January 3, 2025 9:47 AM January 3, 2025 9:47 AM

views 9

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकासांठी विविध केंद्रीय मंत्र्याची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची गुजरातसाठीनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून शिवराजसिंह यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या कडे बिहारसाठी नियुक्ती करण्यात आली असून धर्मेंद्र प्रधान मध्य प्रदेशातल्या पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवती...

December 29, 2024 8:09 PM December 29, 2024 8:09 PM

views 14

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक नवी दिल्लीत सुरु

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक आज नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात सुरु आहे. दुपारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी एका सत्राला संबोधित केलं. पुढच्या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जवळपास पक्षकार्यकारिणीच्या मंंडल तसंच जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुका निम्म्या राज्यांमध्ये घेण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.