September 16, 2025 8:10 PM September 16, 2025 8:10 PM
24
प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बक्षिसं दिल...