March 12, 2025 6:50 PM March 12, 2025 6:50 PM

views 78

जन्म – मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ करण्यासाठी नवे नियम लागू

जन्म – मृत्यू नोंदणीची  प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रीया सुलभ आणि पारदर्शक व्हावी याकरता तसंच बनावट प्रमाणपत्र वितरणाला आळा बसावा म्हणून संबंधित नियमात सुधारणा करण्यात आली आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अधिसूचना आज जारी झाली असून ती तात्काळ लागू झाली आहे.    आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जलद गतीने मिळणार असून चुकीचं प्रमाणपत्र दिल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अर्जदाराने पुरावे म्हणून जोडलेली कागद...