March 17, 2025 4:02 PM March 17, 2025 4:02 PM
15
सोलापूर परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित
सोलापूर जिल्ह्यात छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला परिसरात एका कावळा आणि बगळ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नमुना चाचणीत बर्ड फ्लू आढळल्यानंतर हा परिसर महनगर पालिकेनं बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. तसंच बर्ड फ्लू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.तसंच नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.