March 15, 2025 11:44 AM March 15, 2025 11:44 AM

views 11

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.   या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभाव...

January 29, 2025 9:58 AM January 29, 2025 9:58 AM

views 16

लातूरमध्ये कोंबड्यांना बर्डफ्ल्यूची लागण

लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

January 26, 2025 6:15 PM January 26, 2025 6:15 PM

views 4

नांदेडमध्ये बर्ड फ्लूमुळे ‘या’ भागात अलर्ट झोन

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात किवळा इथं कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे  तिथल्या दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. किवळा इथं नुकतीच कोंबड्यांमधे मरतूक दिसून आल्यानं पशुसंवर्धन विभागानं मृत कोंबड्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पुण्याच्या पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तसंच भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यांच्या तपासणीत या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बर्ड फ्लूचा प्र...

November 10, 2024 7:56 PM November 10, 2024 7:56 PM

views 13

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये पहिल्यांदा एका मुलाला बर्डफ्ल्युची लागण

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका कुमारवयीन मुलाला बर्डफ्ल्युची लागण झाली असून एच-५ या विषाणूमुळे कोंबड्या आणि पक्षांना होणाऱ्या या आजाराची लागण माणसांना व्हायची त्या देशातली ही पहिलीच वेळ आहे. लहान मुलांसाठीच्या विशेष रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु असून अशी लागण होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.