September 21, 2025 6:51 PM September 21, 2025 6:51 PM
11
नवी दिल्लीत भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचं आयोजन
नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ३० आणि ३१ ऑक्टोबरला भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ आयोजित केली आहे. शेती हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून तांदूळ उत्पादन हा भारतीय शेतकऱ्यांचा अभिमान असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. कृषि आधारित निर्यात पुढील ५ वर्षात दुप्पट होण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरेल असं ते म्हणाले.