August 11, 2024 6:42 PM August 11, 2024 6:42 PM
9
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ
देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. २७ फळपिकांसह इतर पिकं मिळ...