August 31, 2024 8:23 PM August 31, 2024 8:23 PM
17
जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण प्रसिद्ध
जैवतंत्रज्ञानातील अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार असं BioE3 धोरण केंद्र सरकारनं आज प्रसिद्ध केलं. या धोरणामुळे देशातल्या जैविक उत्पादनामध्ये वाढ होईल असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले. गेल्या आठवड्यात मंत्रीमंडळानं या धोरणाला मंजुरी दिली होती. या धोरणाचा परिणाम अन्ननिर्मिती, ऊर्जानिर्मिती आणि आरोग्य सेवांवर पडेल असंही त्यांनी सांगितलं. या धोरणाच्या अंमलबजावणीत सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या आधारे रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल.