August 2, 2024 11:17 AM August 2, 2024 11:17 AM
16
बिहारमध्ये वीज पडल्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू
बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये, वीज पडल्यामुळे किमान १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक मृत्यू गया येथे झाले असून, जेहानाबादमध्ये तीन आणि रोहतास जिल्ह्यात दोन मृत्यू झाले आहेत. चालू खरीप हंगामात शेतात काम करणाऱ्या लोकांवर वीज पडल्याने बहुतांश मृत्यू झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनामध्ये झालेल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे.