November 11, 2024 10:33 AM

views 14

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेला आजपासून बिहारमधील राजगीर इथं सुरुवात

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक 2024 स्पर्धेला आजपासून बिहारमधील नालंदा इथल्या राजगीर इथं सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होईल. या स्पर्धा दहा दिवस चालणार आहेत, असं बिहार क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी आकाशवाणी बोलताना सांगितलं.

November 8, 2024 8:20 PM

views 29

बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या

नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी  १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी यंदा गेल्या वर्षीपेक्षा ७० अधिक  गाड्यांची सोय करण्यात आली असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.  

October 19, 2024 2:17 PM

views 15

बिहार मधले IAS सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजीव हंस आणि गुलाब यादव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक

बिहार मधले IAS अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजीव हंस आणि राष्ट्रीय जनता दलाचे माजी आमदार गुलाब यादव यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. IAS सेवेतल्या अधिकाऱ्याला त्याच्या पाटणा इथल्या सरकारी निवासस्थानातून अटक केली तर गुलाब यादवला काल संध्याकाळी दिल्लीतल्या एका रिसॉर्ट मधून ताब्यात घेण्यात आलं.   केंद्रीय एजन्सीच्या गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांनी संजीव हंस यांच्या संदर्भात पाटणा आणि दिल्लीतल्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. या दोघांच्य...

October 17, 2024 8:22 PM

views 10

बिहारमध्ये विषारी दारूच्या सेवनाने २५ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये भेसळयुक्त दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत सिवानमध्ये २० जणांचा, तर  सारण जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री रत्नेश सदा यांनी दिली. दारू पिणाऱ्यांपैकी  २२ जणांची प्रकृती गंभीर असून, ३ जणांची दृष्टी गेली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून, मृतांच्या कुटुंबांना  दारूबंदी कायद्यानुसार नुकसान भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. 

September 30, 2024 9:16 AM

views 16

बिहारमधल्या बागमती नदीच्या पाणीपातळीत वाढ

बिहारमधील शिवहर जिल्ह्यात बागमती नदीची पाणीपातळी वाढल्याने तरीयाकी ब्लॉक भागातील नदीकिनारीचा परिसर जलमय झाला आहे. तरीयानी छप्रा गावातील अनेक घरांत पुराचे पाणी शिरलं असून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीतामढी आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

September 25, 2024 3:09 PM

views 16

बिहारच्या मारहोरा इथं रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात – रेल्वे मंत्रालय

बिहारच्या मारहोरा इथे सुरू असलेल्या रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. वेबटेक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पातून आफ्रिकेत रेल्वे इंजिनाची निर्यात करण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून या इंजिनांची निर्यात सुरू होईल, असंही रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

September 22, 2024 1:57 PM

views 26

बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सुल्तानगंज आणि रतनपूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं या मार्गावरील रेल्वे वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून गंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. गंगा आणि अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पटणा, वैशाली आणि बेगूसराय यांसह १२ जिल्ह्यांत पूर आला आहे. याचा फटका १० लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल पटणा आणि वैशाली य...

September 20, 2024 1:46 PM

views 24

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागाची केली हवाई पाहणी

बिहार आणि उत्तर प्रदेशात पूरपरिस्थिती कायम असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंगा नदी परिसरातल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करून या भागात तातडीनं बचाव आणि मदतकार्य सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गंगा आणि इतर नद्यांना आलेल्या पूरामुळे पाटणा, बक्सर, वैशाली, बेगुसराय, नालंदा हे जिल्हे जलमय झाले आहेत.    उत्तर प्रदेशात २६ जिल्ह्यांना पूराचा तडाखा बसला असून त्यामुळे सुमारे ५ लाख लोक प्रभावित झाले आहेत. बलिया जिल्ह्यात शरयु नदीच...

August 27, 2024 1:54 PM

views 41

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के

बिहारच्या भागलपूर आणि आजूबाजूच्या परिसरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ मोजण्यात आली. भूकंपाचे केंद्र झारखंडच्या संधाल प्रांतातल्या रामगढ जिल्ह्यात होतं. या भूंकपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

August 12, 2024 1:12 PM

views 17

बिहारमधल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री एक वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली, असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितलं. मंदिराचा परिसर अरुंद असल्यामुळे गर्दी नियंत्रणात आणणं शक्य झालं नाही असं म्हणाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर &nbsp...