September 9, 2025 1:37 PM September 9, 2025 1:37 PM

views 11

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीत घेतला. आता बिहारमधल्या अंगणवाडी सेविकांचं मानधन दरमहा सात हजारांवरून नऊ हजार रुपये करण्यात येणार आहे.   तर मदतनीसचं मानधन दरमहा चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे. ही वाढ येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होईल. याशिवाय मुख्यमंत्री कन्या विवाहमंडप योजने अंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला

September 8, 2025 8:25 PM September 8, 2025 8:25 PM

views 16

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी-SCI

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. याचा अर्थ, मतदार यादीत नाव घालण्यासाठी फक्त आधार कार्ड, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या इतर ११ ओळखपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरलं जाईल. तशा सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात, असंही न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या पीठानं निवडणूक आयोगाला सांगितलं. तसंच मतदारांनी सादर केलेल्या आधार कार्डाची पडताळणी करायचे अधिकार या अधिकाऱ्या...

August 29, 2025 1:34 PM August 29, 2025 1:34 PM

views 5

बिहारमध्ये मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत तीन लाख लोकांना नोटीसा

बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण मोहिमेत सुमारे तीन लाख लोकांना संशयास्पद नागरिकत्वावरून नोटीसा बजावल्या आहेत. या मतदार याद्या पुनरिक्षणात या लोकांनी त्यांची ग्राह्य कागदपत्रं जमा केलेली नाहीत.   या लोकांचा अधिक तपास केला असता त्यांचं नागरिकत्व संशयास्पद आढळून आलं असून त्यापैकी बहुतांश जण बांगलादेश व नेपाळचे नागरिक आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, नोटीस दिलेले बहुतांश नागरिक हे पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अररिया आणि सुपौल या...

August 26, 2025 1:11 PM August 26, 2025 1:11 PM

views 12

बिहारमधे 99.11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं जमा

बिहारमधे मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणादरम्यान 99 पूर्णांक 11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं मिळाली असून दावे, हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.   बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबविण्यात येणारी संकलन निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

August 22, 2025 9:54 AM August 22, 2025 9:54 AM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधल्या गया इथं ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील.  ६ हजार ८८० कोटींच्या ६६० मेगावॅट बक्सर औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्री करतील. तसंच ते १२६० कोटींच्या शहरी विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत.

August 1, 2025 9:57 AM August 1, 2025 9:57 AM

views 9

निवडणूक आयोग बिहारमध्ये तयार केलेली प्रारूप मतदार यादी प्रकाशित करणार

बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज निवडणूक आयोग प्रकाशित करणार आहेत. बिहारमधील सर्व 38 जिल्ह्यांमधील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत्यक्ष आणि डिजीटल प्रत देण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी, 243 निवडणूक अधिकारी तसंच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप आक्षेप नोंदवता येतील. आजपासून 1 सप्टेंबरपर्यंतच्या महिन्याभराच्या काळात हे आक्षेप नोंदवता ये...

July 18, 2025 2:05 PM July 18, 2025 2:05 PM

views 15

पूर्व भारताच्या विकासाकरता बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशातली पूर्वेकडची राज्यं प्रगतीपथावर असून पूर्व भारताच्या विकासासाठी बिहारचा विकास अत्यंत गरजेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. बिहारमध्ये मोतिहारी इथं सात हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.    २१व्या शतकात जग वेगाने पुढे जातंय. ज्या प्रमाण...

July 10, 2025 5:14 PM July 10, 2025 5:14 PM

views 13

बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची  परवानगी दिली आहे. न्यायचं हित लक्षात घेता, निवडणूक आयोगानं या प्रक्रिये दरम्यान आधार, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्त्वाची ओळखपत्र स्वीकारण्याचा विचार करावा असं आपलं मत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मतदार यादीचं पुनरिक्षण करणं, ही गोष्ट संविधानाच्या कक्षेत असली, तरी ही प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विशेष पुनरिक्षण प्र...

July 8, 2025 9:14 AM July 8, 2025 9:14 AM

views 6

बिहारसाठी ४ नवीन अमृत भारत रेल्वे सुरू होणार

केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारसाठी देशभरातील विविध शहरांमधून चार नव्या अमृत भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते काल बिहारमध्ये रेल्वेच्या विविध विकासकामांची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. या चार रेल्वे गाड्या नवी दिल्ली-पाटणा, दरभंगा- लखनऊ, मालदा-लखनऊ आणि सहरसा-अमृतसर या मार्गांवर धावतील. समस्तिपूर विभागात त्यांनी कर्पुरीग्राम रेल्वेस्थानकातील विकासकामांची पायाभरणीही वैष्णव यांच्या हस्ते झाली.

May 30, 2025 7:53 PM May 30, 2025 7:53 PM

views 11

बिहारमध्ये विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं ४८ हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा - गया - दोभी महामार्ग, २४९ कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. रालोआ सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे, लोकांपर्यंत शांतता, सुरक्षा आणि शिक्षण पोहोचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.   वाहतूक, ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आ...