October 20, 2024 9:58 AM October 20, 2024 9:58 AM

views 7

बिहारमध्ये पुरग्रस्त नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक पाटण्यात दाखल

बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक आज पाटण्यात दाखल होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करेल तसंच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेईल. गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थसारथी या सात सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व करणार आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानामुळे बिहार सरकारनं केंद्र सरकारकडे तीन हजार 638 कोटी रुपयांची मदत मागितल्याचं बिहारचे आपत्तीव्यवस्थापन विभागाचे मंत्री संतोषकुमार सुमन यांनी म्हटलं आहे.

October 2, 2024 8:08 PM October 2, 2024 8:08 PM

views 8

बिहारमधे आणखी काही भागांना पुराचा तडाखा, पूरग्रस्तांची संख्या १५ लाखावर

बिहारमधे, पुराच्या तडाख्यात आज आणखी काही भाग आल्यानं पूरग्रस्तांची संख्या सुमारे १५ लाख झाली आहे. कोसी, गंडक, महानंदा, कमलाबालन, बागमती, आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढली असून, राज्यातल्या इतर सखल भागातही ते पसरलं आहे. सीतमढी, दरभंगा, पश्चिम चंपारण, मधुबनी, सुपौल आणि सहर्सा या भागांना जास्त तडाखा बसला आहे. पूर्णिया, अररिया, मधेपूरा, आणि किशनगंज जिल्ह्यांमधल्या अनेक गावांमधेही पुराचं पाणी शिरलं आहे.     जलजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पूरग्रस्त भागात बोट ॲम्ब्युलन्स  तैनात केल्या आहेत. राष्ट...