October 10, 2025 1:05 PM
214
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. त्याबरोबरच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर आहे. एकंदर 243 सदस्यांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी, 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 11 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे; मात्र, अद्यापही विविध राजकीय पक्षांमधील जागावाटप...