November 15, 2025 6:11 PM November 15, 2025 6:11 PM
6.1K
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. ८९ जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर संयुक्त जनता दल ८५, लोकजनशक्ती पार्टी रामविलास १९, हिंदुस्तान आवामी मोर्चा ५, राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर व...