November 15, 2025 1:41 PM November 15, 2025 1:41 PM

views 81

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. ८९ जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर संयुक्त जनता दल ८५, लोकजनशक्ती पार्टी रामविलास १९, हिंदुस्तान आवामी मोर्चा ५, राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर व...

November 13, 2025 8:24 PM November 13, 2025 8:24 PM

views 133

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. ३८ जिल्ह्यांमधे मिळून ४६ मतमोजणी केंद्र आहेत. बिहारमध्ये या निवडणुकीत १९५१ नंतर विक्रमी मतदान झालं आहे. ६१६ उमेदवाराचं भवितव्य असलेले ईव्हीएम त्रिस्तरीय सुरक्षा निगराणीखाली ठेवले आहेत, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंजीयाल यांनी दिली. सर्वप्रथम टपालानं आलेल्या मतपत्रिका मोजल्या जातील, त्यानंतर ईव्हीएम वरची मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीसाठी ४ हजारहून अधिक टेबल मांडले आहेत.    नमुना १७ क आणि ईव्हीएम ड...

November 12, 2025 1:22 PM November 12, 2025 1:22 PM

views 911

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झालं होतं, त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण ६६ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतकं मतदान झालं आहे.  बिहारमधे आतापर्यंत  झालेल्या सर्व निवडणुकांमधे यंदा सर्वात जास्त मतदान झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. यात पुरुष मतदारांचं प्रमाण ६२ पूर्णांक ८ दशांश टक्के तर महिला  मतदारांचं प्...

November 11, 2025 3:14 PM November 11, 2025 3:14 PM

views 138

Bihar Elections : दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ६२ टक्के इतकं मतदान झालं होतं.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी ७० लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश, पश्चिम बंग...

November 6, 2025 1:00 PM November 6, 2025 1:00 PM

views 272

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. एकंदर एक हजार ३१४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य तीन कोटी ७५ लाखांहून अधिक मतदार ठरवतील. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, एनडीए आणि महाआघाडीच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांना आकर्षित करण्यासाठी  प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात,   नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील १६ मंत्र्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे, त्यापैकी ११ भाजपचे आहेत. भाजपकडून उपमुख्...

November 4, 2025 12:56 PM November 4, 2025 12:56 PM

views 45

Bihar Elections : पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची सर्व पक्षांना आज शेवटची संधी आहे. त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीच्या सर्व वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज भोजपूर आणि गयामधे सभा घेणार आहेत. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री ...

October 29, 2025 1:28 PM October 29, 2025 1:28 PM

views 38

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. आज छठ उत्सवाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महाआघाडीचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.    वरिष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृृृृृहमंत्री अमित शहा आज बेगुसराय, समस्तीपूर आणि दरभंगा इथं प्रचारसभा घेणार आहेत. तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रचारसभा पाटना जिल्ह्यात होणार आहेत. भाजपाशासित र...

October 22, 2025 8:05 PM October 22, 2025 8:05 PM

views 62

Bihar Elections: दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होईल.    कैमुर जिल्ह्यातल्या मोहनिया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. सुमन यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांचा अर्ज रद्द केला. काल, भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर...

October 22, 2025 1:23 PM October 22, 2025 1:23 PM

views 44

बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जोर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ६ नोव्हेंबरला मतदान होणार असून, निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जात आहेत.   महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहायता गटांशी संबंधित जीविका दीदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी दिलं आहे. स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या प्रत्येक जीविका दीदीला आरोग्य विमा आणि इतर लाभांसह दरमहा ३० हजार रुपये वेतन...

October 15, 2025 7:39 PM October 15, 2025 7:39 PM

views 139

Bihar Elections : प्रधानमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बुथस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी नमो ऍपच्या माध्यमातून संवाद साधला. रालोआसाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन यावेळी मोदी यांनी केलं. संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी रामविलास, राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुुस्तानी आवाम मोर्चा हे भाजपाचे मित्रपक्ष असून यांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोककल्याणकारी योजनांविषयी जनजागृती करावी असंही मोदी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.