June 28, 2025 2:02 PM June 28, 2025 2:02 PM

views 5

बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲपच्या माध्यमातून मतदान

बिहार मध्ये आज होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच मोबाइल ॲप च्या माध्यमतून नागरिक ई मतदान करणार असून, अशा प्रकारे निवडणुकीत मतदानासाठी मोबाइल ॲपचा वापर करणारे बिहार हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. बिहार मधे ६ नगर पंचायत आणि ३६ नगर पालिकांमध्ये आज निवडणुका होत असून सकाळी ७ ते संध्याकाळी ५ दरम्यान मतदान होत आहे. यामध्ये प्रथमच मोबाइल द्वारे ई मतदान करण्यासाठी ४० हजार नागरिकांनी अर्जाद्वारे  निवडणूक आयोगाकडे नाव नोंदणी केली आहे. बिहारसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच राज्य ...