November 19, 2025 3:25 PM November 19, 2025 3:25 PM

views 84

बिहारमध्ये विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नितीश कुमार यांची निवड

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनिर्वाचित आमदार ही आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहेत.   यातही नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असून ते आज सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर ते आपला राजीनामा राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना देण्यासाठी राजभवनात जातील. सध्याच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार आहे.    दरम्यान, पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोह...

November 17, 2025 2:31 PM November 17, 2025 2:31 PM

views 54

बिहारमधे मंत्रिमंडळ बरखास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोेकळा झाला आहे.    राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकांमध्ये ...

November 14, 2025 12:55 PM November 14, 2025 12:55 PM

views 199

बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे. बिहारमधील ३८ जिल्ह्यांतील ४६ मतदान केंद्रावर ही मतमोजणी होत आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन हजार ६१६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीच्या दोन तासांनंतर निकालाचे कल येण्याची शक्यता आहे. टपाली तिकीटांची मोजणी सकाळी ८ वाजेपासून होत आहे.   गेल्या ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. बिहार विधानसभा निवडणुकीत १९५१ नंतर आतापर्यंतचं सर्वाधिक ६७ पुर्णांक १३ टक्के मतदान झाले.

November 5, 2025 4:02 PM November 5, 2025 4:02 PM

views 16

भाजपा नेते किरेन रिजीजू यांची राहुल गांधीवर टीका

बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरेन रिजीजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत. मात्र काँग्रेस अंतर्गत विसंवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी शैलजा यांनी सांगितलं होतं, असं रिजीजू म्हणाले. निवडणुकीत भाजपाने हस्तक्षेप केल्याचा आरोप फेटाळून लावत गांधी विदेशात जाऊन ...

October 30, 2025 2:23 PM October 30, 2025 2:23 PM

views 17

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे नेते मतदारांना आकर्षित करण्याचा  प्रयत्न करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज बिहारच्या विविध भागात प्रचारसभा घेत आहेत. बिहारमध्ये मुजफ्फरपूर इथं नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर टीका केली. जिथे बंदुकीचा धाक आणि क्रौर्य असतं तिथे कायद्याचं राज्य अस्तित्वात नसतं, असं मोदी यावेळी म्हणाले. भ...

October 18, 2025 7:55 PM October 18, 2025 7:55 PM

views 72

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली. या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल.    भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधे बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी चर्चा झाली. त्याआधी अमित शहा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली.    दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चानं विरोध...

October 13, 2025 9:13 AM October 13, 2025 9:13 AM

views 125

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप जाहीर

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रधानमंत्र नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ पक्ष नेते उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर झाल्यानंतर पक्षाचं धोरण आणि उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशाने भाजपानं ही बैठक घेतली....

September 18, 2025 2:30 PM September 18, 2025 2:30 PM

views 23

ECI ची नवी दिल्लीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु

भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीमध्ये मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिल्ली मुख्य निवडणूक अधीकारी कार्यालयानं दिली.    नवी दिल्लीत २००२ साली राबवलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानंतर अद्ययावत करण्यात आलेल्या मतदार याद्या दिल्ली सीईओच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या असून, नागरिका...

July 31, 2025 1:23 PM July 31, 2025 1:23 PM

views 19

बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार

बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार आहे. कुण्या मृत व्यक्तीचं नाव यादीत असेल किंवा एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेलं असेल तर त्यात दुरुस्ती करणं हा याचा हेतू आहे. मतदार याद्यांचा हा मसुदा तात्पुरता असेल, यावर आक्षेप नोंदवल्यावर यात दुरुस्ती केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.   बिहारमधे मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्यावर यात २२ लाख मतदार मृत असल्याचं आढळून आलं, ७ लाख बनावट मतदार तर ३५ लाख स्थलांतरित मतदार आढळले. या सर्वांची नावं मतदार या...

July 23, 2025 7:06 PM July 23, 2025 7:06 PM

views 7

बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण

बिहारमधे मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणाचं काम ९८ टक्के पूर्ण झालं असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आतापर्यंत गोळा झालेल्या माहितीनुसार  सुमारे २० लाख मतदारांचं आधीच निधन झालं आहे, तर सुमारे २८ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत. सुमारे ७ लाख मतदारांची नावं एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवली गेली आहेत. प्रारूप मतदारयादी येत्या १ ऑगस्टला जाहीर होणार असून त्यात राज्यातल्या सर्व पात्र मतदारांची नावं  यावीत  या करता कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत असं आयोगाने सांगितलं.