November 7, 2025 8:58 PM November 7, 2025 8:58 PM

views 28

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे.  भाजपा बिहारला विकसित राज्य बनवेल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथल्या सभेत सांगितलं. राजद आणि काँगेसनं बिहारच्या युवावर्गाला भरकटवण्याचा प्रयत्न केला अशी टीका प्रधानमंत्र्यांनी भाबुआ इथल्या प्रचारसभेत केली.  बिहारमध्ये सत्ता मिळताच राज्याला पूरमुक्त करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु केलं जाईल, असं आश्वासन भाजपाचे नेते अमित शहा यांनी एका प्रचार सभेत दिलं. भाजपा अध्यक्ष ...

November 4, 2025 8:05 PM November 4, 2025 8:05 PM

views 21

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल-प्रधानमंत्री

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत बिहारमधल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मागच्या 20 वर्षांमधले सर्व विक्रम मोडीत काढेल असा निश्चय इथल्या मतदारांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

November 3, 2025 8:33 PM November 3, 2025 8:33 PM

views 29

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार शीगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी असलेली प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यामुळे आज प्रचार शीगेला पोचली आहे.  रालोआ आणि महागठबंधन या आघाड्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी आज बिहारच्या वेगवेगळ्या भागात प्रचारसभा आणि रॅली घेतल्या.    प्रधानमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी सहरसा, कठीहार या ठिकाणी घेतलेल्या प्रचारसभेतमहागठबंधन हा सक्षम नसलेल्या राजकीय पक्षांचा समूह असल्याचा आरोप केला. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस तयार होणार नाही असंही मोदी यावेळी ...

October 26, 2025 8:01 PM October 26, 2025 8:01 PM

views 14

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. एनडीए आणि महाआघाडीच्या ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी आज विविध ठिकाणी सभांना संबोधित केलं. महाआघाडीचं सरकार आलं तर वक्फ कायदा रद्दबातल केला जाईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांचं मानधन दुप्पट केलं जाईल,  तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना निवृत्तीवेनत दिलं जाईल असं आश्वासन राजद नेते तेजस्वी यादव यांनी दिलं. ते अरारिया, कटीहार आणि किशनगंज इथल्या प्रचारसभांना संबोधित करत होते. वक्फ कायदा रद्द करण्याच्या य...

October 26, 2025 8:03 PM October 26, 2025 8:03 PM

views 12

ECI: निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी नियमावली जाहीर

बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपल्यापासून मतदान होण्यापर्यंतच्या शांतता कालावधीत निवडणुकीसंबंधी मजकूर आणि एक्जिट पोल प्रदर्शित न करण्यासंबंधी निवडणूक आयोगानं नियमावली जाहीर केली आहे. या ४८ तासांच्या कालावधीत निवडणुकीवर प्रभाव टाकणारा कोणताही मजकूर प्रसारित करू नये अशा सूचना आयोगानं वृत्तवाहिन्या, नभोवाणी आणि केबल नेटवर्कना केल्या आहेत. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा आणि इतर राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ६ आणि...

October 20, 2025 2:32 PM October 20, 2025 2:32 PM

views 180

Bihar Election : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या १२२ मतदारसंघांमधे मतदान होणार असून यासाठी १ हजार ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे. या टप्प्यात १२१ जागांसाठी १ हजार ३७५ उमेदवार रिंगणात आहेत.    दरम्यान, राजद प्रणीत महाआघाडीचं जागावाटप स्पष्ट झालं आहे. राष्ट्रीय जनता दलानं आज १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली. राजदकडून माजी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी, भ...

October 16, 2025 1:33 PM October 16, 2025 1:33 PM

views 172

Bihar Elections : राजकीय पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर

भारतीय जनता पार्टी ने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामुळं जागा वाटपात पक्षाला मिळालेल्या सर्व १०१ जागांवरचे उमेदवार भाजपाने जाहीर केले आहेत.    संयुक्त जनता दलानंही बिहार विधानसभा निवडणुकीसाठीची ४४ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री लेशी सिंह, जयंत राज, सुमित कुमार सिंह आणि शीला मंडल यांना उमेदवार म्हणून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.   राष्ट्रीय लोक मोर्चाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्य...

October 13, 2025 8:09 PM October 13, 2025 8:09 PM

views 59

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षाची दुसरी यादी जाहीर

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनसुराज पक्षानं  ६५ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी पाटणा इथं पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. याआधी पक्षानं ५१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.  उमेदवारांच्या निवडीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं. भागलपूर मतदारसंघातून अभयकांत झा यांना उमेदवारी दिली आहे.

October 5, 2025 7:08 PM October 5, 2025 7:08 PM

views 27

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी – निवडणूक आयोग

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात, असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. सखोल पुनरीक्षण नियमानुसार झालं असून साडे तीन लाख लोकांनी  आपणहून मतदार यादीतून आपलं नाव वगळण्याची विनंती केली असं ज्ञानेश कुमार म्हणाले. सखोल पुनरीक्षणात मतदाराची ओळख पटवण्यासाठी आधारच्या समावेशाबाबत ...

September 30, 2025 9:11 PM September 30, 2025 9:11 PM

views 69

बिहारमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, साडे २१ लाख मतदारांची वाढ

बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. मसुदा मतदार यादीच्या तुलनेत या यादीत २१ लाख ५३ हजार मतदार वाढले आहेत तर ३ लाख ६६ हजार मतदार कमी झाले आहेत.    २४ जून २००५ रोजी ७ कोटी ८९ लाख मतदार बिहारमध्ये होते. त्यातले ६५ लाख मसुदा यादीत वगळले गेले, त्यानंतर ७ कोटी २४ लाख मतदार यादीत होते. आज प्रसिद्ध झालेल्या यादीत ७ कोटी ४२ लाख मतदार आहेत.