November 15, 2025 6:11 PM November 15, 2025 6:11 PM

views 6.1K

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. ८९ जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर संयुक्त जनता दल ८५, लोकजनशक्ती पार्टी रामविलास १९, हिंदुस्तान आवामी मोर्चा ५, राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर व...

November 11, 2025 7:53 PM November 11, 2025 7:53 PM

views 19

बिहार विधानसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातलं 67.14 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६७ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदान झालं. किशनगंज, कटिहार आणि पूर्णिया या मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं असून किशनगंजमध्ये सर्वाधिक म्हणजे ७६ पूर्णांक २६ टक्के मतदान झालं आहे. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. येत्या १४ तारखेला मतमोजणी होणार आहे.    दरम्यान, ७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. जम्मू क...

November 10, 2025 3:01 PM November 10, 2025 3:01 PM

views 134

Bihar Elections : शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. काही मतदारसंघांमधे सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिं...

October 28, 2025 1:38 PM October 28, 2025 1:38 PM

views 72

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे घटक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार असून यात आपली धोरणं जाहीर करण्यात येतील असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितलं. राओलाची धोरणं, आणि मुख्यमंत्रपदाच्या उमेदवाराच्या नावावर यादव यांनी प्रश्न उपस्थित केले.    राष्ट्रीय जनता दल हा पक्ष फक्त एकाच कुटुंबासाठी काम करतो. मात्र, सरकार सब का साथ सबका विकास या तत्वावर चालतं असं ...

October 18, 2025 9:44 AM October 18, 2025 9:44 AM

views 86

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त; निवडणूक प्रचाराला तेजी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार असून, 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी नितीश कुमार सरकारमधील चार मंत्र्यांसह अनेक प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप उमेदवारांच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्त...

October 15, 2025 1:21 PM October 15, 2025 1:21 PM

views 49

प्रधानमंत्री आज करणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ  भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार आहेत. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत ते बिहारमधे भाजपाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.   दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एनडीएचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानेही ६ उमेदवारांची नावं जाहीर केली.   सीपीआय एम एल लिबरेशनने १८ उमेदवार...

October 5, 2025 2:32 PM October 5, 2025 2:32 PM

views 28

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी  निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या  उपाययोजनांबाबत  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं  त्यांच्याशी संवाद साधला.    निवडणुका मुक्त, निःपक्षपाती आणि  शांततापूर्व वातावरणात व्हाव्या यासाठी उपस्थितांनी मतं मांडली. या बैठकी...

April 17, 2025 8:20 PM April 17, 2025 8:20 PM

views 48

Bihar : समन्वय समिती स्थापन करण्याचा RJD आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा निर्णय

बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा करुन ते मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीनं घेतला आहे. महाआघाडीतल्या सहा घटक पक्षांची बैठक आज पाटणा इथं झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव या समितीचे अध्यक्ष असतील. जागावाटप, प्रचारमोहिम, निवडणूक रणनीती यांच्याशी संबधित मुद्यांवर ही समिती निर्णय घेईल. समान किमान कार्यक्रमही ही समिती तयार करेल.    बिहार विधानसभा...