January 1, 2026 2:33 PM

views 7

बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार

बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष कृती दला बरोबर काल झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला. ‘दयानंद मालाकर, उर्फ छोटू’ अशी त्याचं नाव असून, त्याच्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस होतं. १४ पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तसंच उत्तर बिहारमध्ये अनेक नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या कारवाईत ५.५६ एमएम इन्सास रायफल, एक देशी बनावटीचं पिस्टल, २५ जिवंत काडतुसं आणि १५ वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.  

November 18, 2025 8:06 PM

views 11

बिहारमध्ये NDAच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची बैठक

बिहारमधे, NDA च्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या पाटण्यात होणार आहे. NDA चे घटक पक्ष असलेल्या भाजपा, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या पाच पक्षांचे एकूण २०२ आमदार या बैठकीला उपस्थित राहतील. NDA च्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीच पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. निवड झाल्यानंतर विधीमंडळ पक्षनेता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे धावा करेल.    त्...

November 15, 2025 6:11 PM

views 6.2K

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. ८९ जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर संयुक्त जनता दल ८५, लोकजनशक्ती पार्टी रामविलास १९, हिंदुस्तान आवामी मोर्चा ५, राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर व...

November 9, 2025 8:08 PM

views 63

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आज शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून… - होल्ड व्हीसी - - (१. ११ सेकंद) (बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचारही जोरदार झाला. सर्व पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रय...

November 8, 2025 1:39 PM

views 107

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सितामढी आणि बेत्तीया इथल्या प्रचारसभांना संबोधित करतील. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रोहतस आणि कैमुर जिल्ह्यात सभा घेतील तर गृहमंत्री अमित शहा कटिहार इथल्या प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तरप्र...

November 7, 2025 9:59 AM

views 171

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ई व्ही एम मशीन मध्ये सीलबंद झालं आहे. या टप्प्यात, एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, नितीश कुमार मंत्रिमंडळातील 16 मंत्री आणि महाआघाडीबंधनाचे उमेदवार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा समावेश आहे.   काही तुरळक...

November 1, 2025 3:20 PM

views 27

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार असून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांचे उमेदवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडीचे नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.   बिहारमधे रालोआची लाट असून यावेळीही राज्यात राओलाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख चिराग पासवान यांनी व्यक्त केला. तर महाआघाडी गुन्हेगारांना पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपा ...

October 28, 2025 10:02 AM

views 32

बिहारसह देशभरांत छटपुजेचा उत्साह

सुर्यदेवतेची आराधना करण्याचा, श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छट पूजेचा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जात आहे. बिहारमध्ये, गंगा, गंडक, कोसी, महानंदा आणि बागमती यासारख्या नद्यांच्या काठावर तसंच देशभरातील विविध जलाशयातील छठ घाटांवर सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी भाविक  मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आज अनेक भाविकांनी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छट महापर्व साजरे केले.

October 26, 2025 8:01 PM

views 18

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. एनडीए आणि महाआघाडीच्या ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी आज विविध ठिकाणी सभांना संबोधित केलं. महाआघाडीचं सरकार आलं तर वक्फ कायदा रद्दबातल केला जाईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांचं मानधन दुप्पट केलं जाईल,  तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना निवृत्तीवेनत दिलं जाईल असं आश्वासन राजद नेते तेजस्वी यादव यांनी दिलं. ते अरारिया, कटीहार आणि किशनगंज इथल्या प्रचारसभांना संबोधित करत होते. वक्फ कायदा रद्द करण्याच्या य...

September 26, 2025 1:24 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातनं बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात, प्रधानमंत्र्यांनी बिहारमधल्या ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये थेट हस्तांतरित केले.