November 10, 2025 9:42 AM November 10, 2025 9:42 AM

views 60

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील.  यावेळी जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात...