November 9, 2025 1:54 PM November 9, 2025 1:54 PM

views 23

प्रधानमंत्री मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवार पासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-२ या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे. भूतानचे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील.  यावेळी जागतिक शांती प्रार्थना...

November 8, 2025 11:43 AM November 8, 2025 11:43 AM

views 15

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आज अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.   हे प्रदर्शन थिंफूमधल्या जागतिक शांतिप्रार्थना उत्सवाचा एक भाग असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयानं दिली.

July 20, 2024 3:54 PM July 20, 2024 3:54 PM

views 16

भूतानमध्ये तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा

परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री आणि भूतानचे परराष्ट्र व्यवहार सचिव आउम पेमा छोद्जोन यांच्या सहअध्यक्षतेखाली तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा आज भूतानमध्ये झाली. या बैठकीत १३ व्या पंचवार्षिक योजना कालावधी अंतर्गत विकास भागीदारीची विविध क्षेत्रे, त्यातलं सहकार्य आणि कार्यान्वयनाचे मार्ग, याबाबत चर्चा झाली. परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर असून काल त्यांनी भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतली.

July 19, 2024 2:54 PM July 19, 2024 2:54 PM

views 17

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात ते भूतानच्या राजाची भेट घेतील. त्यानंतर ते भूतानचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची भेट घेतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.