August 3, 2025 11:40 AM August 3, 2025 11:40 AM

views 17

स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश भूषण गवई

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं; सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था देशात तयार केली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते काल बोलत होते.   या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर यांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं.

July 12, 2025 8:21 PM July 12, 2025 8:21 PM

views 9

भारताची न्यायव्यवस्थेत मोठ्या सुधारणांची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

भारताची न्यायव्यवस्था विलक्षण आव्हानात्मक परिस्थितीत आहे आणि त्यात मोठ्या सुधारणांची गरज आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. हैदराबादमध्ये नालसार विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.   वर्षानुवर्षं चालणारे खटले आणि तुरुंगात खितपत पडलेल्या आरोपींची अवस्था ही चिंतेची बाब असल्याचंही ते म्हणाले. न्यायमूर्ती गवई यांनी भावी कायदेतज्ज्ञांना जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन केलं. परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ...

June 28, 2025 7:37 PM June 28, 2025 7:37 PM

views 19

देशातल्या पहिल्या कॉन्स्टीट्युशन प्रीॲम्बल पार्कचं सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झालं. पार्कच्या आवारात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पणही यावेळी झालं. ही वास्तू बाबासाहेबांच्या कार्याचं स्मरण आणि प्रेरणा देत राहील असं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. संविधानातली मूल्यं जनतेपर्यंत ...

April 15, 2025 10:35 AM April 15, 2025 10:35 AM

views 18

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं – भूषण गवई

भारतीय राज्यघटना काळाच्या कसोटीवर खरी उतरली असून, तिने देशाला मजबूत, एकसंघ करत स्थैर्य दिलं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात देशानं अनेक बाह्य आक्रमणं आणि अंतर्गत कलहाचा सामना केला आहे, तरीही काळानुरुप बदल स्वीकारत घटनेत दुरुस्ती करण्यात आल्यानं तो एकसंघ आणि मजबूत आहे, असंही गवई म्हणाले.