December 31, 2024 4:06 PM December 31, 2024 4:06 PM
7
मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बांधकामं थांबवण्याचे पालिकेचे आदेश
मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भायखळा आणि बोरीवली पूर्व भागातली सर्व बांधकामं थांबवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईत काल ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भायखळा आणि बोरीवली पूर्व इथं बांधकांम कंत्राटदार आणि विकासक प्रदूषणासंदर्भातले नियम पाळत नसल्याचं निदर्शनाला आलं आहे. त्यामुळे या भागातली खासगी आणि सरकारी बांधकामं हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बंद ठेवली जातील, असं गगराणी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, वरळी आणि नेव्ही नगर इथल्या बांधकामां...