September 23, 2024 1:22 PM September 23, 2024 1:22 PM

views 8

१२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलानं एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला

एका तासात पाच लाख रोपं लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज १२८ इन्फंट्री बटालियन आणि पर्यावरणीय कृती दलाचं अभिनंदन केलं. राजस्थानच्या जैसलमेर इथे राबवलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेत सैन्याने काल सुमारे ५ लाख २० हजार रोपं लावल्याची माहिती यादव यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात दिली. तसंच त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या भारतीय लष्कर, हवाई दल, सीमा सुरक्षा दल, पोलीस आणि विविध शैक्षणिक संस्थांचं अभिनंदनही केलं.

August 31, 2024 7:46 PM August 31, 2024 7:46 PM

views 6

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज – केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

तरुण पिढीनं आपली प्रतिभा, नवनिर्मिती आणि क्षमता, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वापरण्याची गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत 'आयडियाज फॉर लाईफ' या मोहिमेसंबंधीच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. २०२१मध्ये ग्लासगो इथं झालेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही संकल्पना मांडली होती. जागतिक पातळीवर हवामान बदल रोखण्यासाठी या मोहिमेत समाविष्ट करण्यात आलेल्या ७ विषयांची ...

August 5, 2024 3:38 PM August 5, 2024 3:38 PM

views 9

संसदेच्या सर्व सदस्यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा – मंत्री भूपेंद्र यादव

संसदेच्या सर्व सदस्यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असं आवाहन सर्व संसद सदस्यांना पत्राद्वारे केल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आज ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धन आणि वनक्षेत्र वाढवण्यासाठी सुरू केलेलं अभियान यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.